लाखो लोक रस्त्यावर उतरले – दंगलविरोधी पथक तैनात

लाखो नागरिक रस्त्यावर उतरत हिंसाचार उफाळला

 नेपाळ आणि फ्रान्समध्ये झालेल्या मोठ्या राजकीय आणि सामाजिक उथळ्यांनंतर आता इंग्लंडमध्येही अशांततेचे दावे ऐकायला मिळत आहेत. शनिवारी, 13 सप्टेंबर 2025 रोजी ब्रिटनमध्ये कट्टरपंथी नेते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘युनाईट द किंगडम’ मोर्चात 1,10,000 ते 1,50,000 लोक सहभागी झाले.

मोर्चाची सुरुवात शांतपणे झाली, मात्र लवकरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आंदोलक आणि पोलिस यामध्ये थेट झटापट सुरु झाली. आंदोलकांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या, अधिकाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या संघर्षात अनेक पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. काहींचे नाक, डोके फुटले असून, काहींना हातापायातही गंभीर दुखापत झाली आहे.

टॉमी रॉबिन्सन हे इंग्लिश डिफेन्स लीगचे संस्थापक असून ब्रिटनमधील प्रभावशाली कट्टरपंथी नेते म्हणून ओळखले जातात. रॉबिन्सन यांच्या समर्थकांनी ‘स्टॉप द बोट्स’, ‘सेन्ड देम होम’ आणि ‘वी वांट अवर कंट्री बॅक’ अशा घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांविरुद्ध ठणठणीत निदर्शन केले.

नेपाळमधील हिंसाचारानंतर भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली होती, तर फ्रान्समध्येही परिस्थिती बिकट झाली होती. आता नेपाळ, फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अशांततेमुळे जागतिक पातळीवर गंभीर चर्चेला सुरुवात झाली आहे.

सरकारकडूनही तातडीने उपाययोजना करण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या आंदोलनाचा पुढील वळण काय घेईल आणि सरकार त्यावर कसे नियंत्रण साधेल, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

 सावधगिरीची आवश्यकता – नागरिकांनी गर्दीपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
 आंदोलनामध्ये सहभागी असलेल्यांची ओळख आणि जबाबदारीचा शोध सुरू
 राजकीय व सामाजिक स्थैर्य राखण्यासाठी सरकारच्या पुढील पावलं कोणती असतील याकडे सर्वांचं लक्ष

read also :https://ajinkyabharat.com/me-mahatma-phule-bolatoy/