मुंबई | पुणे | नांदेड – गणेश विसर्जनाच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई आणि नांदेडमध्ये भयंकर अपघात झाले असून शोककळा पसरली आहे. विविध ठिकाणी पाण्यात बुडून आणि विजेचा धक्का लागून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील दुर्दैवी किनार
पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात भामा नदीत दोन तरुण बुडाले असून, कोयळी येथील २० वर्षांचा विद्यार्थी आणि उत्तर प्रदेशाचा १९ वर्षीय युवक यामध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध अद्याप सुरू आहे.
याशिवाय बिरदवडी गावातील विहिरीतून ३६ वर्षीय संदेश पोपट निकम यांचा बुडून मृत्यू झाला. पोहता येणारा असताना देखील तो विहिरीतून बाहेर येत असताना अपघातग्रस्त झाला. एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य करत मृतदेह सापडला.
नांदेडमध्ये दोघे बेपत्ता
नांदेड जिल्ह्यातील गाडेगाव शिवारातील आसना नदीत गणेश विसर्जनादरम्यान तिघे जण पाण्यात वाहून गेले. बालाजी उबाळे आणि योगेश उबाळे हे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध एसडीआरएफ पथकाकडून सुरू आहे.
मुंबईत विजेचा धक्का लागून मृत्यू
मुंबईच्या साकीनाका परिसरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान एका ट्रॉलीला लटकलेल्या ११ हजार व्होल्ट्सच्या हाय टेन्शन वायरचा संपर्क लागून ३६ वर्षीय बिनू शिवकुमार यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी तुषार गुप्ता (१८), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०), करण कानोजिया (१४) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहापूर तालुक्यातील मुंडेवाडीतील घटना
शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील मुंडेवाडी परिसरात गणेश विसर्जन करताना भारंगी नदीत तीन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यातून एक तरुण सापडला, मात्र दत्ता लोटे, प्रतीक जाधव आणि कुलदीप जोकर हे अद्याप बेपत्ता आहेत.
या हृदयद्रावक घटनांमुळे सणाचा आनंद विरजणात बदलला असून, सरकार व प्रशासन यांनी बचावकार्य आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवली आहे. नागरिकांनी गणेश विसर्जनाच्या वेळी अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले