राज्यातील “माझी लाडकी बहीण” योजनेत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. पात्र महिलांना १ लाखांपर्यंत शुन्य टक्के व्याजदराचे कर्ज मिळेल. अनुदान सध्या १५०० रुपये आहे, लवकरच २,१०० रुपये करण्याची घोषणा होणार आहे. मुंबईसह उपनगरात योजना सुरु असून, उर्वरित राज्यात लवकरच लागू होईल. या योजनेसाठी १.१२ कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून १.०६ कोटी अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळत असून, त्यांना उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.
read also:https://ajinkyabharat.com/court-series-captive-mangani/
