लाडकी बहीण योजनेच्या बॅनर वरुन अजित पवारांचा फोटो गायब!

लाडकी

लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी

करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो आहे. मात्र या बॅनर

Related News

वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला नसल्याने

महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

माझा फोटो लावू नका -अजित पवार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची

योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेत

आहे, असा आक्षेप गेल्या आठवड्यातील लाडकी बहीण योजनेवरुन

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आला होता.

सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो

गायब असल्याचे दिसत आहे. यावर अजित पवार आज पहिल्यांदा बोलले.

भाजपाने तुमचा फोटो काढलाय ? या प्रश्नवार अजित पवार म्हणाले की,

“मीच त्यांना सांगितल आहे की, माझा फोटो लावू नका. माझे फारच फोटो

सगळीकडे सुरु झाले आहेत.” असे अजित पवार म्हणाले मात्र महायुतीमध्ये

धुसफूस सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/dubais-princess-launches-banana-divorce-navacha-perfume/

Related News