लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत

लाचखोरीचा भांडाफोड! पातूरचे नायब तहसीलदार लाच घेताना अकोल्यात अटकेत

अकोल्यातील पातूर तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदाराला

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे.

अकोला एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे.

Related News

पातुर मधील नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी सरकारी काम करण्याच्या

बदल्यात 4 हजार रुपयाची लाच मागितली होती. मात्र फिर्यादी यांना लाच द्यायची नसल्याने

त्यांनी अकोल्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली.

दरम्यान पंचा समक्ष अकोला एसीबीच्या पथकाने पडताळणी केली.

दरम्यान, आरोपी लोकसेवक बळीराम चव्हाण यांनी फिर्यादीस 4 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे नायब तहसीलदार चव्हाण यांना अटक करण्यात आली

असून याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/localchaya-darwajyavar-bag-gheun-hang-aaye-dhokadayaka-narnar-rpf-grp-c-action-mode-suru

Related News