कौटुंबिक जबाबदारी आणि SET यशाचा रहस्यमय संगम

SET परीक्षा उत्तीर्ण करून उघडले गूढ”

मानोरा – अंजली काळे (गावंडे) यांनी कौटुंबिक जबाबदारी हातावर घेत असतानाही कठीण समजली जाणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या यशाने शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे, की योग्य निर्धार व मेहनतीने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. अंजली काळे यांचे शिक्षण प्राथमिक ते पदवी पर्यंत कारंजा लाड येथे झाले असून, पदव्युत्तर शिक्षण त्यांनी अमरावती येथील शासकीय विदर्भ महाविद्यालयात पूर्ण केले आहे. शिक्षक होण्यासाठी आवश्यक B.Ed तसेच मराठी आणि इतिहास या दोन विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केले आहे. उच्चशिक्षित अंजली काळे यांनी काही वर्षे ज्ञानदान केले असून, मुलांचे संगोपन करत असताना ही परीक्षा उत्तीर्ण करणे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. या यशाचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत असून, मानोरा येथे ठाणेदार म्हणून कार्यरत महिला पोलीस अधिकारी नयना पोहेकर यांनी देखील श्रीमती अंजली काळे आणि त्यांच्या पती यांचा सन्मान केला. अंजली काळे यांचे हे यश अनेक गृहिणी व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांनी सिद्ध केले आहे की कौटुंबिक जबाबदारी असूनही उच्च शिक्षणात प्रावीण्य मिळवता येते.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/dharan-ughdalayanantar-nadikathchaya-gavanamadhya-chinta-vadhali/