कुठलाही तांत्रिक बिघाड नसतानाही शेलुबाजार येथील स्टेट बँकेचे एटीएम बंद

शेलुबाजार

शेलुबाजार – येथील स्टेट बँकेचे एटीएम केंद्र मंगळवार,

दि. २६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी बंद असल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

सणासुदीच्या दिवसात खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असताना अचानक एटीएम बंद झाल्यामुळे ग्राहक त्रस्त झाले.

विशेष म्हणजे, एटीएमची पाहणी केली

असता त्यात कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नाही.

तरीही ते बंद ठेवण्यात आले होते. एटीएम बंद ठेवण्यामागचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून,

यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एटीएमवर कोणतेही सूचनाफलक लावले नसल्याने नागरिकांना

माहिती न मिळता ते इतर ठिकाणी पैसे काढण्यासाठी भटकावे लागले.

यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया गेला.

नागरिकांची मागणी :

या घटनेची चौकशी करून, जबाबदार बँक अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी,

अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

प्रतिक्रिया :

राम सुर्वे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मंगरुळपीर यांनी सांगितले की,

“जवळपास चाळीस गावांची बाजारपेठ असलेल्या शेलुबाजार येथील

स्टेट बँकेचे एटीएम कोणत्याही कारणाशिवाय बंद करण्यात आले होते.

सणासुदीच्या दिवसात ही गंभीर बाब असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.”

read also:https://ajinkyabharat.com/smt/