कुरणखेड – कुरणखेड या गावातून अनेक सैनिक सीमेवर आपली सेवा देत असतात कुरणखेड ही भूमी शहीद सैनिक त्याचबरोबर
आजी-माजी सैनिकांच्या नावाने प्रचलित आहे. अशा भूमिती भूमिपुत्र नितेश घाटे हे काल शहीद झाल्याची बातमी समोर येत आहे.
इंडियन आर्मी पुलगावच्या अंतर्गत येत असलेल्या अकोला जिल्हा मधिल कुरणखेड या गावचे असलेले
नितेश मधुकर घाटे हे गेल्या पंधरा वर्षापासून भारतीय सैन्यात फाईव्ह मराठा बटालियन मध्ये आपली सेवा देत आहे.
ते गेल्या काही दिवसापासून अयोध्या येथे त्यांची ड्युटी सुरू होती मात्र ता.२८ रोजी त्यांना आपल्या कर्तव्यावर असताना
शॉक लागून शहीद झाल्याची बाब कुरणखेड येथे पोहोचताच संपूर्ण कुरणखेड गावात शोककळा पसरली आहे.
कुरणखेड येथील शेतकरी मधुकर घाटे हे गेल्या कित्येक वर्षांपासून शेती करून आपला संसार चालवत आहे.
त्यांनी आपल्या तीन मुलांना शिकवत एक मुलगा प्रगतशील शेतकरी म्हणून आपले काम पाहत आहे .
मोठा मुलगा संदीप घाटे हा सुद्धा आर्मी मध्ये आपली सेवा देत होता .
सेवा संपल्यानंतर त्याचा अपघाती मृत्यू झाला होता,
त्या घटनेवर काही वर्ष होते ना होते काल त्यांचे लहान मुलगा नितेश मधुकर घाटे याला सुद्धा आपल्या कर्तव्यावर असताना
अयोध्या येथे वीरगती प्राप्त झाली आहे.
त्यामुळे घाटे परिवारात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून कुरणखेड गावासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे .
अंदाजे 30 जुलै पर्यंत नितेश घाटे यांचे पार्थिव कुरणखेड या गावात पोचणार असून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार होणार आहे.
