‘बिग बॉस 19’च्या स्पर्धक अभिनेत्री कुनिका सदानंद ही तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिचं गायक कुमार सानू यांच्यासोबतचं नातं एकेकाळी फार गाजलं होतं. विवाहित असताना कुमार सानू आणि कुनिका जवळपास पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये नवरा-बायकोसारखे राहत होते.
या नात्याविषयी कुनिकाने कधीही लपवाछपवी केली नाही. मात्र आता प्रथमच तिचा मुलगा अयान लाल याने या अफेअरबाबत मौन सोडलं असून एका मुलाखतीत तो आईविषयी मनमोकळा झाला.
अयानने केलं खुलासं
‘वीकेंड का वार’ एपिसोडनंतर अयानने आरजे सिद्धार्थ कन्नन याला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला –
“मला खूप उशिरा आई आणि कुमार सानू यांच्या रिलेशनशिपबद्दल कळलं. तोपर्यंत त्यांचा ब्रेकअप झाला होता. जेव्हा आई सतत त्यांची गाणी गुणगुणायची तेव्हाच मला थोडंफार जाणवलं. लोकं म्हणतात की त्यांचं अफेअर जवळपास 27 वर्षे होतं, पण प्रत्यक्षात ते काही वर्षांचं नातं होतं. वयाच्या 35 व्या वर्षी आईने मला जन्म दिला.”
अजूनही आहे का प्रेम?
सिद्धार्थने थेट विचारलं – आजही कुनिकाच्या मनात कुमार सानूंविषयी काही भावना आहेत का? त्यावर अयानने उत्तर दिलं –
“आईला त्या कलाकारावर खरोखर प्रेम आहे, पण त्या माणसावर आता नाही. जेव्हा मी त्यांच्याविषयी गुगलवर सर्च करून आईला विचारलं, तेव्हा ती म्हणाली – तो माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा पुरुष होता. मी त्याच्याकडे जोडीदार म्हणून पाहायचे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी असं प्रेम अनुभवलं पाहिजे. पण ते नातं खूप टॉक्सिक होतं.”