कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत,ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका- प्रकाश आंबेडकर

सध्या राज्यात

सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे.

मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे

आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत.

Related News

तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे.

त्यांना आमच्या प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे.

असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर

आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसतायत.

त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय.

कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं ते म्हणालेत.

“कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.

विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे,” असे खळबळजनक विधान

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.

“कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे,

त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत.

कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे,

असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत,

बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार

यांच्यासोबत तर अजिबातच नाही,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे.

हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल.

माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे.

ही जनगणना झाली पाहिजे,” अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Read also: https://ajinkyabharat.com/tension-flares-up-again-in-bangladesh/

Related News