Kunal Kamra Eknath Shinde : कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे…”

कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, "डाव्या विचारसरणीचे..." आमच्यावर कविता करा, आम्ही टाळ्या वाजवू. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर कारवाई केली जाईल. या गोष्टी या महाराष्ट्रात सहन करणार नाही. काहीही झालं तरीही विनाकारण प्रसिद्ध मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. स्टॅण्डअप कॉमेडी आम्हाला आवडते, त्याला दादही देतो. अलहाबादियालाही आम्ही सोडलं नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही कितीही दबाव आणला तरी कारवाई होईल. डाव्या विचारसरणीचे किंवा अर्बन नक्षल म्हणा, समाजातील मानकांना अपमानित करणं, देशातील संस्थांना अपमानित करणं, देशाच्या यंत्रणांवरून विश्वास उठला पाहिजे, अशी कामं करणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला.

याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे.

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Related News

त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल

मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली.

खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला.

याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुणाल

कामराविरोधातही अंधेरी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त आहे.

आज दिवसभरात हा मुद्दा चर्चेत राहणार असून विधानसभेतही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊयात.

Related News