कुलस्वामिनी चंडिकादेवी प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन व गणेश उत्सव उत्साहात साजरा

गणपती चित्रकला, मातीचे गणपती व शिक्षक दिनाचे मनमोहक कार्यक्रम

कुरणखेड – कुलस्वामिनी चंडिकादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अकोला यांच्या वतीने संचालित कुलस्वामिनी चंडिकादेवी प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 06 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षक दिन व गणेशोत्सव कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वेषभूषेत सजवून शाळेत बोलावण्यात आले. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व सर्जनशीलतेने आपले विषय शिकवले, ज्यामुळे शिक्षक व उपस्थित नागरिक भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या वातावरणात उत्साही व प्रेरणादायी ऊर्जा पसरली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गणपतीचे चित्रकलेतून सादरीकरण केले तसेच माती व शाळू मातीच्या सहाय्याने गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे कार्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी मोदक बनवून आणले आणि त्यांच्या कलात्मकतेची झलक दर्शविली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुशी सोनोने, अर्पिता इंगळे, राखी गवळी, शिल्पा ढोकले, दिपाली दहीकार, साधना गोडेस्वार, सानिका सोनोने, मंगला भुसारे व अंकित घाटोड यांनी अथक परिश्रम घेतले.

शिक्षक दिन व गणेशोत्सवाच्या आनंदात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून परस्पर स्नेहाचे व आदराचे वातावरण निर्माण केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व शिक्षकांच्या योगदानाला सन्मानित करण्याचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/vidanchal-the-school-akot-yehe-teacher-day-2/