अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
Related News
“गोळ्या पाकनं झाडल्या, पण स्फोट भारतानं घडवले!”
“..तरच आम्ही हस्तक्षेप करणार!” — वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाची ठाम टिप्पणी
ऑपरेशन सिंदूरनंतर उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्र्यामध्ये थेट चर्चा;
पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अकोल्याचा झेंडा फडकावला
निंबा फाटा ते काजीखेळ रस्ता: खड्ड्यांचे साम्राज्य, बांधकाम विभाग झोपेत!
बाळापूर येथे भाजपची भव्य ऐतिहासिक तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न
35 लाख घरांची लॉटरी, नवी मुंबईसाठी दोन नवीन धरणं;
भारताचे 4 कोटींचे आंबे अमेरिकेने का परत पाठवले?
राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न गंभीर :
मनोज जरंगे पाटलांचा भुजबळांच्या शपथविधीवर संताप :
राज्यात अपघातांची मालिका: डंपर नदीत कोसळला, दुचाकीची समोरासमोर धडक;
छगन भुजबळ मंत्रिमंडळात पुन्हा एण्ट्री;
हे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पार पडले.
या आंदोलनाचा थेट परिणाम पीक नुकसानीच्या सर्वेक्षणावर झाला असून,
खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर कृषी सहायकांच्या अनुपस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात.
संघटनेचे म्हणणे आहे की, मागील बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मागण्या मान्य केल्या होत्या, मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
-
कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती
-
पदनाम बदलून “सहाय्यक कृषी अधिकारी” करणे
-
कामकाज डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे लॅपटॉपची सुविधा
-
पदोन्नतीतील अडथळे दूर करणे
-
इतर विविध सेवा आणि सवलतींची अंमलबजावणी
संघटनेने स्पष्ट केलं आहे की, मागण्या मान्य करूनही त्यांची पूर्तता केली जात नसेल,
तर पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या कृषी
सहाय्यकांचा असाच उद्रेक पुन्हा होऊ नये, यासाठी शासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/gaagavamadhye-urshun-patiranya-zarinwar-halla/