दहीहंडी 2025 ठाणे : कोकण नगर गोविंदा पथकाने रचला विश्वविक्रम!
ठाणे : संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे खिळवणाऱ्या ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात आज इतिहास रचला गेला. मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची मानवी पिरॅमिड रचून दहीहंडी फोडत विश्वविक्रम प्रस्थापित केला.
या थरांमुळे त्यांनी याआधीचा जय जवान पथकाचा विक्रम मोडीत काढला.
संपूर्ण मैदानात “गोविंदा आला रे!” च्या घोषणांनी कानठळ्या बसल्या.
उंची, थरार आणि जोश यांचा मेळ घालत पथकाने सर्वांना थक्क केले.
यावेळी ठाणेकरांनी साक्षात इतिहास घडताना पाहिला. जमावात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कोकण नगर पथकाचे हे धाडस पाहून अनेकांना थरकाप उडाला, पण विजयाचा जल्लोष रंगला.
दहाव्या थरावर उभा राहून चिमुकल्या गोविंदाने दहीहंडी फोडताच मैदानात आनंदाच्या लाटा उसळल्या.
आयोजक प्रताप सरनाईक यांनी या पथकाला अभिनंदनाचा वर्षाव केला.
हा विक्रम केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कोकण नगर गोविंदा पथक = महाराष्ट्राचा मान, गोविंदांचा अभिमान!
READ ALSO :https://ajinkyabharat.com/khasdar-amar-kenni-manchavarch-expressed-keli-naraji/