कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर!

अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी

राज्यातील हवामान कमालीचे बदलत असून, मागील दोन

दिवसांपासून विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. काही

Related News

ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपांचा तर कुठे रिमझीम पावसाच्या

सरी बरसताना दिसत आहे. हिच स्थिती पुढचे तीन दिवस कायम

राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या

अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य

प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रदीर्घ काळ विश्रांती

घेऊन पुन्हा सक्रीय झालेला हा परतीचा पाऊस तर नव्हे ना? असा

सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, परतीच्या पावसाबाबत

आयएमडीने अद्याप तरी भाष्य केले नाही. पर्जन्यमान यंदा

समाधानकारक म्हणावे असे आहे. राज्यातील बहुतांशी भागात

पावसाने हजेरी लावली आहे. अर्थात, त्यातही काही कमी अधिक

प्रमाण आहे. मात्र, असे असले तरी अगदीच नाही असेही चित्र

नाही. त्यामुळे बळीराजा आणि पशुपालन करणाऱ्या नागरिकांसाठी

ती एक सुखकारक बाब आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस राज्यात

पावसाचा सीलसीला कायम राहणार असल्याची शक्यता गृहीत

धरुन हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला

आहे.खास करुन रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी हा अलर्ट असून,

या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान अंदाज व्यक्त

करताना वर्तविण्यात आली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी

रेड अलर्ट देण्यात आला आहे. नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई

उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

वरील जिल्हे सोडून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

जारी करण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/schools-closed-today-teachers-collective-raza-andolan-in-the-state/

Related News