कोंडोली येथे नागदेवतेचे वारुळ पुजन मोठ्या उत्साहात

कोंडोली येथे नागदेवतेचे वारुळ पुजन मोठ्या उत्साहात

श्रीक्षेत्र कोंडोली येथील यात्रा मैदानावर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नागपंचमी निमित्त दि २९ जुलै ला

सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान नागदेवतेच्या वारुळाचे पूजन करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोंडोली गावात नागोराव हुंबे आणि आनंदवाडी येथील महादेवराव आरेकर यांच्या

घरी मकराची दि २३ जुलै ला स्थापना करून रोज संध्याकाळी बाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम होतो .

दि २४ जुलै ला दुपारी संपूर्ण दोन्ही गावातून मकराची भव्य शोभा यात्रा काढण्यात येत असून अरूनावती नदीत मकराचे विसर्जन करण्यात येते .

गावातील युवा तसेच प्रौढ मंडळी मोठ्या उत्साहात बाऱ्याकरिता सहभागी झाले होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/suicide-kalelya-tutte-daapatya-kutumbala-rahul-bondre-and-ashok-padghan-yanchi-economic-hands/