महाराष्ट्रात GBS चा कहर सतत वाढतांना दिसत आहे. या आजाराची लागण झालेल्यांची
संख्या 200 च्या पार गेली आहे. त्यामुळे राज्यात एकच चिंतेचं वातावरण आहे.
आरोग्य विभागाच्या मते, एकूण रुग्णांपैकी 180 रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
या आजारामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय.
रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
राज्यातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अर्धवट शिजवलेले अन्न किंवा कोंबडीचे मांस खाऊ नये,
असे आवाहन केले आहे. पुण्यात कोंबड्यांच्या मांसामुळे जीबीएस
पसरल्याची चर्चा असताना जीबीएसचा धोका टाळण्यासाठी अन्न पूर्णपणे शिजवा,
असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलंय.
तर अन्न पूर्ण शिजवल्याने जीबीएसचा धोका टाळण्यासाठी मदत होऊ शकते.
दुसरीकडे पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवेरे यांनी देखील अन्न पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला दिला आहे.
गुइलेन बॅरे सिंड्रोम नेमका काय?
दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील औषध विभागाच्या डॉक्टरांच्या मते,
हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजाराची लक्षणे स्वाइन फ्लूसारखीच आहेत.
ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि जास्त ताप येतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराची
रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या नसांवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्नपणा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/devachaya-dararatch-bhavikachi-loot-shirdi-saibabanya-darshanasathi-galya-ghadla-ghadla-blow-type/