कोलकात्यातील दोन बँकांची कोट्यवधी फसवणूकनागपुरातून तीन भावंडांना सीबीआयने अटक
नागपूर :कोलकात्यातील दोन बँकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक नागपुरात सक्रिय झाले आहे. सीबीआयच्या तपासात प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस असलेल्या तीन भावंडांना नागपूरातून अटक करण्यात आली, तर अन्य एकाला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले गेले आहे.अटक करण्यात आलेले भावंडे आहेत – राजकुमार चुरेवाल (वय ६१), माधव चुरेवाल, दीपक चुरेवाल, तर छत्रपती संभाजीनगर येथून अटक झालेला राजेश चुरेवाल (वय ५९) आहे.कोलकाता सीबीआयने २००४ मध्ये एका बँकेच्या फसवणूक प्रकरणात राजकुमार आणि माधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, तर २००७ मध्ये दुसऱ्या बँकेच्या फसवणूक प्रकरणात अन्य दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात चौघेही फरार होते. २०१० मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चौघांना फरार घोषित केले होते.तपासात असे आढळले की, फरार असताना चौघांनी ओळख लपवण्यासाठी नावे बदलली आणि बनावट दस्तऐवज तयार केले. सीबीआयच्या विविध पथकांनी त्यांचा शोध सुरू ठेवला. माहिती मिळाल्यानुसार, तिघे नागपुरात तर एक छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याचे समोर आले.रविवारी नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सीबीआयच्या पथकांनी छापा मारून तिघांना नागपूरातून आणि एकाला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. नंतर त्यांना कोलकात्याला नेऊन न्यायालयात हजर केले आणि सीबीआय कोठडीस पाठवले.आता या भावंडांविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी नागपुरातही गुन्हा दाखल केला जाणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-obc-sangharsh-committee-sub-divisional-officer-yana-andwotnacha-gesture/
