कोकणात मुसळधार पावसाचा कहर!

कोकणात मुसळधार पावसाचा कहर!

रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या

घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वेमार्ग बंद झाला असून जनशताब्दी,

Related News

तेजस, नेत्रावती एक्सप्रेससारख्या गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या आहेत.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळल्या.

त्याचा मोठा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून,

रेल्वे ट्रॅकवर मोठमोठे दगड आल्यामुळे गाड्यांना पुढे जाता आलेले नाही.

प्रवासी ताटकळले, प्रशासन सतर्क

प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू असून, कोकण रेल्वे सुमारे दीड

तास उशिराने धावणार असल्याचे संकेत आहेत. नेत्रावती एक्सप्रेस सध्या रत्नागिरीत थांबली असून,

जनशताब्दी एक्सप्रेस वैभववाडीत, तर तेजस एक्सप्रेस कणकवलीत थांबली आहे.

वैभववाडी स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकून पडले आहेत.

शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान

मुसळधार पावसामुळे कोकणासह मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतीचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

काही भागांत भात लागवडीपूर्वीच शेतात पाणी साचले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हवामान खात्याचा इशारा कायम

हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/kedarnath-te-dehradunparyant-pavasacha-gesture/

Related News