कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;

कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार; सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नदीकाठी असलेल्या वसाहतींना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आंबा आणि कुंडलिका नद्यांचाही जलपातळी वाढली असून प्रशासन सतर्क आहे.

Related News

रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ढगफुटीसदृश्य पावसाचा धोका आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.

2021 ची आठवण करणारी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी बचाव पथके तयार ठेवण्यात आली असून,

महाड परिसरात बोटींची तयारी ठेवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या सूचनेनुसार पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

 नागरिकांना आवाहन:
– अनावश्यक प्रवास टाळावा
– अधिकृत सूचनांचं पालन करावं
– अफवांपासून दूर राहावं

 सावित्रीसह कोकणातील नद्या धोक्याच्या रेषेजवळ पोहोचल्या असून पावसाची तीव्रता वाढल्यास

महाड आणि रत्नागिरी परिसरात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सावध राहावे.

Read Also : https://ajinkyabharat.com/gaganveer-shubhanshu-shukla-yanchi-prithvavar-yashasvi-punargaman-18-days/

Related News