अकोला शहरात अल्पवयीनांकडून चाकू हल्ला; दोन आरोपी ताब्यात, तिघांचा शोध सुरू..

अकोला

अकोला : शहरातील अकोला येथील खदान पोलीस ठाणे हद्दीत चाकू हल्ल्याच्या सलग तीन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. श्रद्धानगर कौलखेड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, खडकी परिसरात रविवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास हा प्रकार घडला.

प्राथमिक माहितीनुसार, काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनीच चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या तिन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा तसेच गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जलद कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन अल्पवयीन संशयित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Related News

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/akola-news-akolyat-3500-square-feet-grand-rangoli-16-tasant-sakarlan-historical-picture-of-emperor-ashoka/

Related News