किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

पातूर, १८ फेब्रुवारी २०२५ – भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात १५९८ हून अधिक बांगलादेशी

व रोहिंग्या मुसलमानांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Related News

या तक्रारीची दखल घेत अकोला जिल्हा प्रशासनाने गुरुवारी या

प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती गठित केली आहे.

किरीट सोमय्या यांनी यापूर्वीही असा प्रकार अकोला शहरात घडल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर त्यांनी पातूर तालुक्यातील परिस्थिती पाहण्यासाठी आज,

१५ फेब्रुवारी २०२५ रोजी पातूर पोलीस स्टेशनला भेट दिली.

या दौऱ्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमय्या यांच्या सोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आता या आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि पुढील तपासातून काय निष्पन्न होते,

याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Click here for more updates : https://ajinkyabharat.com/akolidhi-dharana-movement-suru/

Related News