किरण माने म्हणतात -समजून घेतल्यानंतर मी याविषयी खुप सजग झालो…

किरण

अभिनेते आणि शिवसेनेचे नेते किरण माने यांनी कॉ. शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांना अभिवादन केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी सिनेमा, नाटक आणि साहित्यांतून चालत आलेल्या सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले आहे.किरण माने यांच्या म्हणण्यानुसार, “आपल्याकडं पुर्वीपासून एका विशिष्ठ वर्गानं मनोरंजनाच्या नावे मराठी सिनेमे, नाटकं, मालिका आणि कादंबऱ्यांमधून वर्चस्वाचा कावेबाज डाव रचलाय. ‘कला’ ही फक्त करमणूक करण्यासाठी नसते; ती समाजावर संस्कार, मूल्य आणि आदर्श रूजवते. परंतु या क्षेत्रावर कब्जा करून त्या विशिष्ठ वर्गाने विषमतावादी विचार समाजमनात पेरले आहेत.”किरण माने पुढे म्हणाले की, “सिनेमांमधील व्हिलन, उच्चवर्णीय व्यक्तीची प्रतिमा आणि त्यांच्या कृतींमधून समाजात जातीय वर्चस्वाचे बेमालूम चित्र रचले जाते. उदाहरणार्थ, पूर्वी सिनेमातील खलनायक हा ‘पाटील’ असायचा, त्याच्याखालील इतर पात्रं जातउतरंडीमधली व्यक्ती असायची. उच्चवर्णीय पात्र मात्र देवभोळे, सांस्कृतिक मार्गदर्शक किंवा समंजस शिक्षक म्हणून दाखवले जात. हे ‘राजकारण’ इतक्या बेमालूम पद्धतीने रचले जाते की प्रेक्षकांना ते जाणवतही नाही.”त्यांनी ऐतिहासिक सिनेमे आणि नाटकांची उदाहरणे देत सांगितले की, छत्रपती शिवराय किंवा संत तुकाराम यांच्या प्रतिमेला बदलून दाखवणे, सामाजिक वर्चस्वाचा इतिहास लपवणे आणि बहुजन समाजावरील छळाचे चित्र लपवणे हेही सांस्कृतिक राजकारणाचा भाग आहे.किरण माने म्हणाले, “कॉ. शरद पाटील यांची ‘सौतांत्रिक दृष्टी’ मला सतत सजग ठेवते. सांस्कृतिक वर्चस्वाच्या बेड्या तोडून मला मुक्त करणारी ही दृष्टी माझ्यातल्या कलाकाराला समृद्ध करते.”किरण माने यांनी पोस्टच्या शेवटी कॉ. शरद पाटील यांना विनम्र अभिवादन केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/india-europe-trade-nawa-mahakaya-dealcha-marg/