किन्हीराजा – किन्हीराजा ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच सौ. शितल नयन कुमार जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९ वाजता ही सभा संपन्न झाली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रमेश कंकाळ (गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालेगाव) उपस्थित होते. याशिवाय, जी. प. सदस्य सुनील गोदमले, पंचायत समिती सदस्य सौ. शोभाताई गोंडाळ, सेवा सहकारी सोसायटीचे सभापती अशोकराव नालिंदे, उपसभापती बुड्ढन पठाण, उपसरपंच रवींद्र तायडे, पोलीस पाटील महादेव तायडे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट सदस्य, महसूल अधिकारी एन. व्ही. अंबुलकर, कृषी सहाय्यक केशव सरनाईक, आरोग्य कर्मचारी रामभाऊ फड यांचे प्रमुख सहकार्य लाभले.सभेत सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. प्रमुख मुद्दा पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा यावर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी एन. एम. साळुंके यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवून कार्यक्रम यशस्वी केले.
read also : https://ajinkyabharat.com/seva-pandharwada-under-chhatrapati-shivaji-maharaj-maharajaswa-abhiyan/
