किड्स प्लॅनेट स्कूलमध्ये बाल नेतृत्वांचा शपथविधी सोहळा उत्साहात
अकोट : स्वातंत्र्य दिनानिमित्त किड्स प्लॅनेट स्कूल, अकोट येथे विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना बालपणापासूनच समजावे, नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, सामाजिक सेवाभाव जागृत व्हावा या उद्दिष्टांसाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
शाळेच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नेतृत्वाची शपथ घेतली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन एसएसटी प्रमुख ठाकूर व विशाल सरोदे यांनी शिस्त व आकर्षकतेने केले. शैक्षणिक प्रमुख मनीष अढाऊ व मुख्याध्यापिका रितू आढाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या अँकर मनीषा डिक्कर यांनी केले. सुरुवातीला शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे महत्त्व व कार्य स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बॅज व सॅश प्रदान करण्यात आले.
🔹 विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची घोषणा :
हेड बॉय – मास्टर विराट ढोरे
हेड गर्ल – कु. रेणुका दुबे
संचार मंत्रालय – मास्टर आदित्य चौधरी
शिस्त मंत्रालय – समर्थ गवांदे
सांस्कृतिक मंत्री – आर्यन सावरकर
ग्रीन क्लब मंत्रालय – पियुष रायबोले
युवा विकास मंत्रालय – आदिराज नागरे
क्रीडा मंत्रालय – अन्वेष मोगरे
पाणी वाचवा मंत्रालय – कु. रूही शर्मा
सामाजिक कल्याण मंत्रालय – श्रावणी कडू
ऊर्जा संवर्धन मंत्रालय – कु. आरोही लोणारे
कार्यक्रमाचा समारोप कु. दिशा ओईंबे यांनी आभार प्रदर्शनाने केला. यावेळी देशभक्तीचा भाव व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भूमिका व संकल्प स्पष्ट करण्यात आले.
हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणारा ठरला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/havaman-khatyacha-hi-alert-160-km-vegane-dhadkel-mahatufan/