मानोरा तालुक्यातील कारखेडा परिसरात पुन्हा एकदा
खोराडी नदीच्या पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर
आला आणि तीरावरील शेतशिवार पाण्याखाली गेले.
कपाशी, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर
कसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
शेतकरी वंदना जाधव, मनोहर जाधव, दशरथ राठोड,
अनुप देशमुख यांच्यासह अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत.
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळेच नुकसान झाले असताना पुन्हा आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
खोराडी नदी दरवर्षी शेतांमधून वाहते, त्यामुळे पिकांचे नुकसान कायम राहते.
शेतकऱ्यांनी वारंवार पूरप्रतिबंधक बांधकाम,
खोलीकरण आणि सरळीकरणाची मागणी केली असली
तरी शासन आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त होत आहे.
शेतकरी म्हणतात, “आमच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे पीक
पाण्यात वाहून जाते, पण आमच्या आक्रोशाला प्रशासन दाद देत नाही.”
Read also : https://ajinkyabharat.com/13-thousandhun-more-padanasathi-bharati-suru-21-support/