खोलेश्वरात उभारले अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय !

खोलेश्वरात उभारले अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय !

महिला, ज्येष्ठांकरिता सोयी सुविधा
शौचालयात पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेवर भर

अकोला: मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये खोलेश्वर परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक

शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयात आधुनिक सोयी सुविधा, संसाधने, पाण्याची व्यवस्था,

Related News

सार्वजनिक स्वच्छता, कमोडसह महिला, ज्येष्ठांकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा द्यावा, याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारात विशेष पाऊले उचलण्यात आलेली आहेत.

त्याअनुषंगाने मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये खोलेश्वर परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे.

या निधीतून शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड यांच्या कल्पनेतून आणि व्यापक समाज हित डोळ्यासमोर ठेवून सर्वप्रथम

अत्याधुनिक सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले आहे. याकरिता मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली

मनपाचे जेई मितेश शर्मा, कनिष्ठ अभियंता वाडेकर, शहर अभियंता अजय गुजर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या शौचालयात महिला, ज्येष्ठ नागरिकांना कमोडची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.

यासोबत शौचालयात आधुनिक सोयी सुविधा, संसाधने, सार्वजनिक स्वच्छता, परिसरात पेव्हर्स बसविणे,

नागरिकांच्या स्वच्छतेकरिता टॉवेल्स व टिशू पेपर्स उपलब्ध करून देण्यात आले.

नागरिकांना वापराकरिता मुबलक पाण्याची व्यवस्था, परिसरातील आवारांची सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे.

त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता सुधारते, पर्यावरणाची काळजी घेतली जाते आणि लोकांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायक अनुभव मिळत आहे.

प्रभागात सोयी सुविधायुक्त शौचायल निर्माण झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं आनंद झळकत आहे.

10 लाखांच्या निधींची उपलब्धता !

महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ

शिंदे यांच्या पुढाकार निधीची उपलब्धता करून देण्यात आली होती.

सार्वजनिक ठिकाणी अत्याधुनिक शौचालय उभारण्यासाठी 10 लाखांच्या निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी महिला, नागरिक ज्येष्ठांनाही अत्याधुनिक शौचालय वापरता यावे याकरिता सर्व सोयी सुविधायुक्त शौचायल निर्माण केले.

यामध्ये आधुनिक संसाधने, नळ व पाणी व्यवस्था, कमोडसह इतर वापरण्याच्या गोष्टींची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे.

रमेश गायकवाड, शहरप्रमुख, शिवसेना अकोला.

Read Also : https://ajinkyabharat.com/footlela-rastyamue-ho-hoto-citizen-tussle/

Related News