खोक्याचे पॅकअप, सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात, कसा पोहचला प्रयागराजला? काय धक्कादायक खुलासा

खोक्याचे पॅकअप, सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात, कसा पोहचला प्रयागराजला? काय धक्कादायक खुलासा

Khokya Bhosale Beed Police : बीडमधील शिरूर तालुक्यात दहशत माजवणारा खोक्या भोसले याचा बीड पोलिसांनी अखेर ताबा घेतला आहे.

प्रयागराज येथून त्याला बीडमध्ये आणण्यात येईल. विमानाने त्याला आणण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यात दहशत माजवणारा सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

Related News

तो प्रयागराजच्या दिशेने सटकल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर बीड पोलिसांनी तपासाची वेगानं चक्र फिरवली.

खोक्याला प्रयागराज येथे उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आले. बीड पोलिसांनी त्याचा ताबा मिळवला आहे.

त्याला लवकरच बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्याला विमानाने छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावर आणण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याला बीडला नेण्यात येईल.

प्रयागराज न्यायालयात हजर करणार

खोक्या भोसले याला प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात येईल. ट्रान्झिट रिमांडनंतर त्याला बीडला आणण्यात येईल.

त्याला विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याला बीडमध्ये नेण्यात येईल.

त्यानंतर त्याला विविध गुन्ह्यात कोर्टासमोर हजर करण्यात येईल. त्याचे तीन ते चार व्हिडिओ व्हायरल झाले आहे.

त्याआधारे त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे वन्यप्राणी कायद्यातंर्गत सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल.

असा पोहचला प्रयागराजला?

खोक्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याची बाजू मांडली. त्यानंतर पोलिसांवर टीकेची झोड उठली.

प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच त्याने धूम ठोकली. तो अगोदर अहिल्यानगर येथे गेला. तिथून तो पुणे येथे पोहचला.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून ट्रॅव्हल्सने तो प्रयागराजला पोहचला. तिथे लपण्याचे ठिकाण शोधण्यापूर्वीच स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले.

सतीश भोसले याचे व्हिडिओ समोर आल्यापासून त्याची चर्चा होत आहे. त्याने बॅटच्या सहाय्याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे.

तर कारमध्ये नोटाची बंडल फेकताना, घरात टेबलवर नोटांची बंडलं फेकताना, मोजतानाचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

इतर आरोपींना अटक करा

सतीश भोसलेला अटक झाली सगळे आरोपींना अटक केली पाहिजे.

त्यांनी आम्हाला मारलं त्यांचे बाया माणसं आमच्यावर आरोप घेत आहेत, आम्ही पुरावे सादर करणार आहोत.

महिला मंडळ त्या ठिकाणी नव्हतं फक्त सतीश भोसलेची गँग होती. शासनाने महिलांचा रेकॉर्ड तपासायला पाहिजे महिला कुठे काय करतात.

खोटे आरोप आमच्यावर कोणी लावूनये. कायद्याने त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पीडित महेश ढाकणे यांनी केली.

सुरेश धस यांची बोलकी प्रतिक्रिया

दरम्यान बीडमध्ये सतीश भोसले याच्या दहशतीची चर्चा सुरू आहे. शिरूरमध्ये गेल्या रविवारी त्याला अटक करण्यासाठी मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता.

तर दुसरीकडे आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची मागणी पण करण्यात आली होती. त्यावर धसांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

गुन्हा दाखल करायला मी काय भाजीपाला आहे का? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

काहीच संबंध नसताना सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येवरून लक्ष

हटवण्यासाठी विरोधक मुद्दामहून अशी मागणी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Read more news here : https://ajinkyabharat.com/kaahi-ladkya-bahiniyankade-chachaki-level/

Related News