खोक्या भोसलेच्या अडचणी संपता संपेना, वनविभाग घेणार मोठी ॲक्शन

खोक्या भोसलेच्या अडचणी संपता संपेना, वनविभाग घेणार मोठी ॲक्शन

बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करून भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेला अटक केली आहे.

त्यांच्यावर वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून घर बांधल्याचा आरोप आहे.भाजप कार्यकर्ता

आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.

Related News

बीड आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं.

खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर आता खोक्या भोसलेच्या

अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात वनविभाग मोठी ॲक्शन घेण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या ग्लास हाऊसवर वन विभाग फिरवणार बुलडोझर फिरवणार आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसलेने वन विभागाच्या जागेत घर बांधले आहे. याप्रकरणी वन विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या जागेसाठी मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सात दिवसात मालकी हक्क दावा दाखल न केल्यास पुढील

कारवाई करून वनविभाग हे अतिक्रमण काढणार आहे, असे म्हटलं जात आहे.

गेल्या 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात सतीश उर्फ
खोक्या भोसलेच्या विरोधात 3 आणि वनविभागाच्या वतीने 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related News