खेट्री सरपंचाची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली

खेट्री सरपंचाची याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारली

सिंचन विहिरीचे ३० प्रस्ताव प्रलंबित प्रकरण

पातुर तालुका प्रतिनिधी पातुर पंचायत समिती अंतर्गत खेट्री ग्राम पंचायत मार्फत दीड वर्षांपूर्वी ३०

सिंचन विहिरीचे प्रस्ताव पातुर पंचायत समितीमध्ये प्रलंबित असल्या प्रकरणी सरपंच जहूर खान ,

व लाभार्थी शेख तन्वीर , मो. निसार,शेख युसुफ, नूर खान यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेऊन

Related News

याचिका दाखल केली होती. अखेर ती याचिका उच्च न्यायालयाने २० फेब्रुवारी रोजी स्वीकारली आहे.

त्या याचिकेवरून उच्च न्यायालय लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना नोटीस पाठवून जबाब मागविणार आहे.

लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी खेट्री येथे ग्रामसभा आयोजित करून ३० लाभार्थ्यांची यादी तयार करून

पातुर पंचायत समिती मध्ये सादर करण्यात आली होती. परंतु पंचायत समितीचे कार्यक्रम अधिकारी रितेश

सोनोने यांनी पैशाची मागणी केली, पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून सादर केलेले ३० सिंचन

विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय व तांत्रिक मंजुरातसाठी प्रलंबित ठेवण्यात आल्याबाबत खेट्रीच्या सरपंचसह ग्रामस्थांनी थेट

नागपूर उच्च न्यायालय धाव घेऊन याचीका दाखल केली असून, ती याचिका न्यायालयाने स्वीकारली असून,

त्या याचिकेवरून लवकरच सुनावणी होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावर काय कारवाई होते.

याकडे खेट्री वासियांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया

पातुर प. स. चे कार्यक्रम अधिकारी रितेश सोनोने यांनी विहिरीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतासाठी पैशाची मागणी केली

,पैशाची मागणी पूर्ण न केल्याने दीड वर्षापासून हेतूपरस्पर ३० सिंचन विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवले,

त्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती याचिका न्यायालयाने २०

फेब्रुवारी रोजी स्वीकारली असून, न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

जहूर खान सरपंच खेट्री

बॉक्स

हक्काच्या लाभासाठी ग्रामस्थांची न्यायालयात धाव

सिंचन विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सरपंचाने ग्रामसभा घेतली, प्रस्ताव घेऊन पंचायत समितीमध्ये सादर केले,

परंतु पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने दीड वर्षापासून ३० विहिरीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याने सरपंचसह

सग्रामस्थांना न्यायासाठी न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे लाभ घेण्यासाठी आर्थिक पैशाची उधळपट्टी होणार असल्याचे निश्चित आहे.

Read more news here :https://ajinkyabharat.com/sunita-williams-9-mahinyandasun-antaraat-adkalelya-sunita-vilayamscha-pagar-kiti/

Related News