खामगावमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर

महिलांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी भाजपाने आणि सरकारने घेतली तत्परता

खामगाव: गरोदर महिला यांच्यासह इतर सर्व महिलांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी भाजप तसेच सरकार तत्पर असून, त्यांच्या आरोग्यासाठी सतत विशेष आरोग्य शिबिरे ठिकठिकाणी राबवली जातील, असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया चे सहसंयोजक सागर दादा फुंडकर यांनी केले.देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा या विशेष कार्यक्रमाच्या अंतर्गत आज खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात महिलांच्या विविध आजारांशी संबंधित विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन सागरदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने महिलांनी घेतला व त्यांनी फुंडकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी रुग्ण महिलांची व्यक्तिगत विचारपूस करताना, कोणत्याही शस्त्रक्रियेसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.शिबिरात वैद्यकीय सेवा प्रदान करणारे होते: वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे आणि त्यांचे वैद्यकीय कर्मचारी.या प्रसंगी भाजपाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर पुरोहित, डॉ. एकनाथ पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, तालुकाध्यक्ष श्याम पाटेखेडे, तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सौं अनिता देशपांडे, राम मिश्रा, पवन गरड, गजानन मुळीक, शिवानी कुलकर्णी, भाग्यश्री मानकर, श्रद्धा धोरण, भक्ती वाणी, पूजा वऱ्हाडे, जितेंद्र पुरोहित, गणेश जाधव, गणेश सोनोने, इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. तत्पूर्वी, सागरदादा फुंडकर व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने सामान्य रुग्णालय परिसरात ‘एक पेड मा के नाम’ या अभियानांतर्गत वृक्षारोपण देखील करण्यात आले.

read also:https://ajinkyabharat.com/relationship-punha-rawaar-ananyache-paul-uchalle/