खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अडचणीत

खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अडचणीत

मानवी तस्करीचा संशय; महिला आयोगाचा तपास आदेश

खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक झालेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत.

बीडमधील एका सेवाभावी संस्थेने तक्रार दाखल करत, खेवलकर यांनी पार्टीसाठी

वारंवार हॉटेल बुक केल्याचा आणि मानवी तस्करीचा संशय असल्याचा दावा केला आहे.

या तक्रारीनंतर महिला आयोगाने पुणे पोलिसांना सविस्तर तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

तक्रारीतील गंभीर दावे

खेवलकर यांनी एका हॉटेलमध्ये तब्बल २८ वेळा रूम बुक केली.

वारंवार मुलींना बोलावल्याचा आरोप.

हे एक संघटीत रॅकेट असू शकते, असा संशय.

आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले

पुणे पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली की, खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ

आणि मेसेजेस सापडले आहेत. त्यामुळे आरोपीची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.

प्रांजल खेवलकर कोण?

प्रांजल खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई असून, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी

खडसे यांचे पती आहेत. त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले जाते.

Read Also : https://ajinkyabharat.com/pigeon/