खडकीत माणुसकीचं दर्शन:

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

अकोला | प्रतिनिधी विशेष

खडकी परिसरात माणुसकीचा एक सुंदर प्रत्यय देणारी घटना घडली आहे.

एका मांजरीने गच्चीवर दोन गोंडस पिलांना जन्म दिला होता.

Related News

काही दिवसांनी मांजरीने अस्वस्थपणे वेगळा आवाज काढायला सुरुवात केली, ज्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले.

 पाईपमध्ये अडकलेलं पिल्लू… आणि सुरू झाला जीवदानाचा संघर्ष

संघदास वानखडे (जि.प. शिक्षक) आणि त्यांची पत्नी भारती वानखडे यांनी आवाज लक्षात घेत गच्चीकडे धाव घेतली.

तेव्हा त्यांना लक्षात आलं की मांजरीचं एक पिल्लू पाईपमध्ये अडकलेलं आहे आणि त्याचा आवाज आतून येतोय.

 भर उन्हात घेतला जीव धोक्यात

क्षणाचाही विलंब न करता वानखडे यांनी रितेश भिवगडे (लोको पायलट – गूड्स) यांना मदतीसाठी बोलावले.

दोघांनी मिळून भर दुपारी, प्रचंड उन्हात, पाईप तोडण्याचा आणि पिल्लाला सुखरूप बाहेर काढण्याचा धाडसी प्रयत्न केला.

त्यांनी अत्यंत संयम आणि काळजीपूर्वक प्रयत्न करत अखेर पिल्लाला जिवंत बाहेर काढलं, त्यावेळी उपस्थितांमध्ये आनंद आणि कौतुकाची लाट उसळली.

 समाजातून कौतुकाचा वर्षाव

या दोघांच्या माणुसकीच्या आणि संवेदनशीलतेच्या कृतीबद्दल स्थानिक नागरिक आणि प्राणीमित्रांकडून त्यांचं जोरदार कौतुक केलं जात आहे.

आजच्या यांत्रिक युगात, एक बेजुबान प्राण्याच्या जीवासाठी घेतलेली ही मेहनत खऱ्या अर्थाने “प्राणीमात्रांविषयीची आपुलकी” अधोरेखित करते.

Read Also : https://ajinkyabharat.com/gunghe-drug-deun-married-sexual-exploitation/

Related News