खड्डे आणि बंगाली बाभळीमुळे अकोट–अकोला मार्गावर अपघाताचा धोका
मुंडगाव – अकोट-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळील
पुलावर पडलेले मोठे खड्डे आणि रस्त्यालगत वाढलेली बंगाली बाभळी अपघातास
कारणीभूत ठरत आहेत.
खड्ड्यांमुळे चारचाकी वाहने सरळ दोन चाकी वाहनांवर येत असून,
त्यामुळे कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले असून,
आजही ४५ किमीचा सिमेंट रस्ता अपूर्ण आहे.
ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे
हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
याच निष्काळजीपणामुळे या मार्गावर किरकोळ अपघात झाले असून,
वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
केंद्रीय उपाध्यक्षा हमिदा शेख, सहकोषाध्यक्षा उज्वला डोबाळे यांनी खड्डे त्वरित
बुजवून बंगाली बाभळीची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे.
अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा फाऊंडेशनने दिला आहे.
या प्रकरणी उपविभागीय अधिकारी (सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अकोट) आर. ए. सुलतान
यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
ठेकेदाराने कामात टाळाटाळ केल्यास होणाऱ्या अपघातांना तोच जबाबदार राहील, असेही त्यांनी सांगितले.
महामार्गावरील खड्डे भरले नाहीत तर अपघातांची मालिका रोखणे अशक्य ठरेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-trumpchi-navi-toriff-threats/