यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केली शस्त्रक्रिया; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस डॉक्टर फरार

बिहारच्या सारण जिल्ह्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे.

यूट्यूबवर व्हिडीओ पाहून डॉक्टरने एका 15 वर्षीय मुलावर

Related News

शस्त्रक्रिया केली. यात त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात

बोगस डॉक्टरही फरार आहे. अजित कुमार पुरी असे आरोपी

पोलिसाचे नाव आहे. त्याला उलट्या आणि पोटदुखीची तक्रार

होती. उलट्या आणि पोटदुखीची त्रास होत असल्याने मुलाच्या

पालकांनी त्याच्या शुक्रवारी रात्री मधुरा येथील डॉक्टर अजित

कुमार पुरी यांच्या दवाखान्यात दाखल केले होते.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पुरी यांनी त्यांच्या माहितीशिवाय

आणि संमतीशिवाय किशोर वयीन मुलावर शस्त्रक्रिया केली.

धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी मोबाईलवर यूट्यूब व्हिडिओ पाहून

शस्त्रक्रिया केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ऑपरेशन

दरम्यान, मुलाची प्रकृती खालावली. जेव्हा कुटुंबाने विरोध केला

तेव्हा पुरी यांनी पालकांनाच सुनावले. “मी डॉक्टर आहे की तुम्ही?”

अशा शब्दात पालकांना डॉक्टरांनी खडसावले.

मुलाच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नसल्याने अखेर मुलाला

पाटणा येथील रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू

झाला. त्यानंतर पुरी याने मुलाचा मृतदेह सोडून घटनास्थळावरून

पळ काढला.पुरी यांच्यावर निष्काळजीपणा आणि गैरवर्तनाचा

आरोप करत कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल

केली. तक्रारीत पालकांनी बनावट डॉक्टर आणि त्याच्या

क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना

पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/hamibhawane-soybean-procurement-center-started-for-90-days/

Related News