केवळ 500 रुपयात देवीच्या शक्तिस्थळांचं दर्शन

एकाच दिवशी अनेक मंदिरं; किफायतशीर प्रवास आणि सुखद अनुभव

पुणे : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने भाविकांसाठी विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांना भेट देणं आता अधिक सोयीचं आणि किफायतशीर होणार आहे. ही सेवा पूर्णपणे वातानुकूलित आणि स्मार्ट इलेक्ट्रिक बसेसद्वारे उपलब्ध होणार आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये या बसेस धावतील. याशिवाय, मागणीनुसारही प्रवाशांसाठी या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या सेवेसाठी प्रवासी तिकीट दर केवळ 500 रुपये ठेवण्यात आला आहे.

  पर्यटन बस क्र. 13 (अ)
पुणे स्टेशन → तळजाई माता → पद्मावती → तुकाई माता → म्हस्कोबा (कोंढणपूर) → जोगेश्वरी माता → यमाई माता (शिवरी) → पुणे स्टेशन

पर्यटन बस क्र. 13 (ब)
पुणे स्टेशन → सारसबाग महालक्ष्मी → तांबडी जोगेश्वरी → चतुःश्रुंगी माता → वैष्णवी माता (पिंपरी) → भवानी माता → पुणे स्टेशन

या बसेस सकाळी 8.30 वाजता पुणे स्टेशनवरून सुटतील आणि संध्याकाळी 7.00 वाजता परत येतील .तिकीट बुकिंगसाठी डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, पुणे मनपा भवन, भोसरी आणि निगडी येथील केंद्रे उपलब्ध आहेत.या विशेष सेवेमुळे भाविकांना नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनाचा लाभ सहज आणि किफायतशीर पद्धतीने घेता येणार आहे. पुणेकरांसाठी PMPML ची ही योजना सोयीस्कर ठरत आहे.

read also:https://ajinkyabharat.com/cortex-contribution-suit/