केबीसी १७ चा पहिला एपिसोड ठरला रोमहर्षक — मानवप्रीत सिंगने २५ लाखांवर मारली मजल, पण ५० लाखांचा प्रश्न ठरला अडथळा

"केबीसी हा फक्त एक गेम शो नसून, तो लाखो लोकांच्या आशा आणि स्वप्नांचा प्रवास आहे.

मुंबई : कौन बनेगा करोडपतीच्या १७व्या पर्वाची शानदार सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना थरारक खेळाचा अनुभव मिळाला.

पहिला स्पर्धक मानवप्रीत सिंग याने आपल्या चटकन उत्तर देण्याच्या क्षमतेने २५ लाख रुपयांपर्यंतचा प्रवास केला.

पण ५० लाख रुपयांचा साहित्याशी संबंधित प्रश्न त्याच्यासाठी जिंकण्याऐवजी शो सोडण्याचे कारण ठरला.

२५ लाखांचा प्रश्न — झटक्यात दिले उत्तर

२५ लाख रुपयांसाठी विचारले गेले —

“२०२५ मध्ये, विश्वनाथ कार्तिकेय हा कोणता विक्रम करणारा सर्वात तरुण भारतीय ठरला?”

पर्याय —
A) इंग्लिश चॅनल पार करणे
B) जगाला प्रदक्षिणा घालणे
C) सेव्हन समिट्सवर चढाई करणे
D) उत्तर ध्रुवावर पोहोचणे

मानवप्रीतने C) सेव्हन समिट्सवर चढाई करणे हे अचूक उत्तर देऊन २५ लाख रुपयांवर शिक्कामोर्तब केले.

५० लाखांचा अडथळा

५० लाख रुपयांसाठी प्रश्न होता —

“रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या ‘पुरबी’ हा कविता संग्रह कोणत्या दक्षिण अमेरिकन लेखिकेला समर्पित केला होता?”
पर्याय —

A) गॅब्रिएला मिस्ट्रल
B) व्हिक्टोरिया ओकॅम्पो
C) मारिया लुइसा बॉम्बाल
D) तेरेसा दे ला पार्रा

मानवप्रीतकडे लाईफलाईन नव्हती आणि उत्तराचा अंदाज घेणे धोकादायक ठरले असते.

त्यामुळे त्यांनी २५ लाख रुपये घेऊन खेळ थांबवला. योग्य उत्तर B) व्हिक्टोरिया ओकॅम्पो होते, जे अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

अमिताभ बच्चनचे खास उद्गार

शोच्या सुरुवातीला बिग बी म्हणाले, “केबीसी हा फक्त एक गेम शो नसून, तो लाखो लोकांच्या आशा आणि स्वप्नांचा प्रवास आहे.

सूत्रसंचालन करणे म्हणजे माझ्या वाढत्या कुटुंबासोबत बसण्यासारखे आहे. या पर्वासाठी आम्ही दुप्पट मेहनत घेऊ.”

हा पहिला एपिसोड पाहून असं म्हणायला हरकत नाही की केबीसी १७ मध्ये पुढचे काही आठवडे

प्रेक्षकांना भरपूर थरार, ज्ञान आणि भावनांचा मिलाफ अनुभवायला मिळणार आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/nationalist-sharad-pawar-gatachaya-15-navya-pravishyanchi-announcement/