Kaveri Engine Project : आपण स्वबळावर ‘तेजस’ हे फायटर विमान बनवलय.
पण या विमानांसाठी ज्या इंजिनची आवश्यकता आहे, ते आपल्याकडे नाहीय.
त्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावं लागतय.
इंजिन निर्मितीमध्ये स्वावलंबी होण्यासाठी आपणही एका खास मिशनवर काम करतोय, त्या बद्दल जाणून घ्या.
‘तेजस’च्या रुपाने भारताने स्वबळावर फायटर विमान विकसित केलय. पण कुठलही लढाऊ विमान, हेलिकॉप्टर किंवा UCAV बनवण्यासाठी एका चांगल्या इंजिनाची आवश्यकता असते.
भारताकडे स्वत:च फायटर जेट आहे. पण इंजिनासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावं लागतय. असं नाहीय की, आपण स्वबळावर इंजिन विकसित करण्याचे प्रयत्न सोडून दिलेत.
भारतही फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर काम करत आहे. या प्रोजेक्टच नाव आहे कावेरी इंजिन.
Related News
कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे.
हे इंजिन DRDO च्या अंतर्गत गॅस टर्बाइन अनुसंधान प्रतिष्ठानने (GTRE) विकसित केलय.
या इंजिनचा वापर भविष्यात मानव रहीत विमानात म्हणजे UAV मध्ये करण्याची भारताची योजना आहे.
भारताच स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्याचं मिशन संपलेलं नाही. कावेरी इंजिन विकसित करताना जे अनुभव आले,
त्यातून नवीन दिशा मिळणार आहे. स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन विकसित करणं हा मिशनचा मुख्य उद्देश आहे.
कुठल्या देशांकडे आहे हे इंजिन?
कावेरी इंजिनच्या इनफ्लाइट परीक्षणला मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंजुरी देण्यात आली. जगातील केवळ पाच देश ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका,
रशिया आणि चीन या देशांनीच अशा प्रकारच एडवान्स इंजिन विकसित केलं आहे. हे ते देश आहेत, ज्यांच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा वीटो पावरचा अधिकार आहे.
भारतही या एलिट क्लबमध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यात मानव रहीत विमानं UAV साठी या इंजिनचा वापर करण्याची भारताची योजना आहे.
कावेरी इंजिन प्रोजेक्टची सुरुवात कधी झालेली?
स्वदेशी तेजस फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं जात आहे.
भारताचं स्वदेशी एअरो-इंजिन विकास कार्यक्रमातील हे एक महत्त्वाच पाऊल आहे
. कावेरी इंजिन परियोजनेची सुरुवात 1980 च्या दशकात झाली होती. पण यात अनेक अडथळे,
अपयश आलं. DRDO ने वर्ष 2016 मध्ये पुन्हा या कार्यक्रमावर काम सुरु केलं.
भारताच स्वबळावर स्वदेशी इंजिन विकसित करण्याच स्वप्न आहे. इनफ्लाइट परीक्षणात यश
मिळाल्यास ते आत्मनिर्भर संरक्षण टेक्नोलॉजीच्या दिशेने एक मोठं पाऊल असेल.
कावेरी इंजिनची चाचणी यशस्वी ठरल्यास भारताच अन्य देशांवरील अवलंबित्व कमी होईल.
Get more news here : https://ajinkyabharat.com/rajan-salvi-akhher-rajan-sastrai-thackeray-gat-sodanyamagach-khar-sangitalam-or-netyacham-ghetalam-boat/