कावडयात्रेने इंझोरी परिसर दुमदूमून गेले

कावडयात्रेने इंझोरी परिसर दुमदूमून गेले

इंझोरी : श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारला इंझोरी गावांमध्ये सकाळीच कावड यात्रेचे आगमन होताच संपूर्ण गाव हर हर महादेव,

बम बम भोले च्या गजराजाने दुमदुमून गेले होते.

गावातील मानाची कावड यांनी कूपटा येथील महादेव संस्थान वरील विहिरीचे जल भरून सुमारे बारा किलोमीटर पायी चालत

सकाळीच इंझोरी गावामध्ये कावड दाखल झाली कावड यात्रेदरम्यान गावामध्ये हर हर महादेव,

बम बम बोले च्या गजरा ने संपूर्ण परिसर दणाणून गेले होते . यादरम्यान गावामध्ये विविध ठिकाणी या कावड यात्रेची महिलांनी

पूजा करून आरती करण्यात आली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चहा, पाणी, फराळ, उसळी चे वाटप कावड

यात्रेदरम्यान असणाऱ्या भाविकां साठी करण्यात आले दुपारी बारा वाजताच्या नंतर इंझोरी गाववाशीयांचे आराध्य

दैवत गोमुखेश्वर महादेव संस्थान वरील महादेवाला आणलेल्या जला ने जलाभिषेक करण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/both-days/