कावड यात्रेत मोटारसायकल घुसल्याने एका कावडधारकाचा जागीच मृत्यु….

कावड यात्रेत मोटारसायकल घुसल्याने एका कावडधारकाचा जागीच मृत्यु....

चिखली –

तालुक्यातील गुळभेली येथे नवीनच बांधण्यात आलेल्या महादेव मंदिराची पहिलीच कावड यात्रा येथील ग्रामसेवक नागपुरे यांच्या नेतृत्वात

दुसरा श्रावण सोमवार असल्याने काल दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास गुळभेली येथून बुधनेश्वरला ४० कावड धारकांसह निघाली.

बुधनेश्वर येथे कावड यात्रा पोहचल्यानंतर आज पहाटे १२ वाजता आरती झाल्यावर दुसरा श्रावण सोमवार असल्याने ही कावड यात्रा परत गुळभेली कडे मार्गस्थ झाली.

दरम्यान बुलढाणा ते अजिंठा रोडवरील पळसखेड नागो गावाजवळ आली असता,

सकाळी ३:३० वाजता मागून आलेली मोटारसायकल ( एम एच २८- बिझेड – ५२७४ ) अचानक कावड यात्रेत घुसुन कावडधारी

( मुकेश गजानन राठोड) ( रा. करवंड, वय २५ वर्षे ) यांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला,

तर योगेश चव्हाण आणि एक कावडधारी आणि दुसऱ्या कावड यात्रेतील कावडधारी मोटारसायकलस्वार ऋषिकेश काकडे आणि मनोज माळोदे जखमी झाले.

या सर्व जखमींना कावड धारकांनी बुलढाणा येथील रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मुकेश गजानन राठोड यांना मृत घोषीत केले.

सदर मोटर सायकल स्वार हे दोघे बुलढाणा शहरातील मुठ्ठे भागातील रहिवाशी असून ते दोघेही दुसऱ्या कावड यात्रेत गेले होते, पण थकल्यामुळे ते मोटर सायकलने बुलढाणा येते परत येत होते.

कावड यात्रेतील मृतुक हा शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा सेवेकरी असून ते विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत.

त्यांच्या मृत्यूने करवंड आणि गुळभेली गावावर शोककळा पसरली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/officers-and-employees-under-the-meal-week/