काटेपूर्णा धरणात पाणीसाठा 91%; अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा इशारा

काटेपूर्णा प्रकल्पात पाणी साठा जवळपास पूर्ण

अकोला: काटेपूर्णा प्रकल्पात सध्या पाणीसाठा 91.29% असून,

येत्या दि. 29 ऑगस्ट 2025 पर्यंत अकोला जिल्ह्यात आणि शेजारील भागात अतिवृष्टीची शक्यता

असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

काटेपूर्णा धरण प्रकल्प प्रशासनाने नागरिकांना सतर्क केले आहे की,

पावसामुळे प्रकल्पातील पातळी वाढल्यास नदीपात्रात आवश्यकतेनुसार पाणी विसर्ग केले जाऊ शकते.

यामुळे नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी,

नदीपात्रात प्रवेश करू नये आणि पंप, अवजारे किंवा जनावरांसह तत्सम साहित्य हलवू नये,

असे इशारा देण्यात आला आहे.

काटेपूर्णा प्रकल्पाचे पूर नियंत्रण कक्ष नागरिकांशी सतत संपर्कात असून,

आवश्यक ती माहिती वेळेत पुरवण्यात येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

read also:  https://ajinkyabharat.com/akot-municipal-safai-karchayancha-sakhi-nutrition-promotion-and-palace/