काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडले

काटेपूर्णा धरणाचे दहा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

बार्शीटाकळी – तालुक्यातील महान काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज (18 ऑगस्ट 2025)

दुपारी 3:30 वाजता काटेपूर्णा प्रकल्पाचे 10 दरवाजे 60 सें.मी. उंचीने उघडण्यात आले. यामुळे धरणातून तब्बल 480 क्युमेक्स इतका

पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार हा विसर्ग वाढविण्यात किंवा कमी करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, नदीकाठावरील सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्र ओलांडू नये, नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

धरणातील वाढता जलसाठा पाहता संबंधित विभागाने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे. पूर नियंत्रण कक्ष आणि अधिकारी २४ तास परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/bharartachi-5-fatal-shatre/