अकोला, दि. ३१ ऑगस्ट २०२५ – काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने
( दि. ३१ ) आज सकाळी ११.१५ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ६० सें.मी. उंचीने उघडण्यात आले.
यामुळे एकूण ९६.११ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात वेळोवेळी
बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे,
नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित गावांना त्यांच्या स्तरावरून सावध करण्यात आले
असून काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून
परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akola-tod-metermore-gharguti-krishnapana-15-lakhuni-savalat/