कशी करणार प्रक्रिया?

लाडक्या बहिणींवर नवा नियम

 लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने नवा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलेकरिता ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे काही महिलांना फटका बसण्याची शक्यता असून, पात्र लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी (ऑगस्ट 2024) मोठ्या दणक्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी मतांचा खेळ बदलणारी ठरली. मात्र, योजनेत पुरुषांची घुसखोरी आणि काही शासकीय महिला अधिकाऱ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर सरकारने निकषांची जंत्री वाढवली आहे.

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महिलांवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. मात्र, उशीर न करता महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा हप्त्यांमध्ये अडचण येऊ शकते.

अशी करा e-KYC प्रक्रिया

लाभार्थी महिला CSC सेंटरवर जाऊन किंवा स्वतः ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ : ladakibahin.maharashtra.gov.in

आवश्यक कागदपत्रे : नाव, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी.

संकेतस्थळावर लवकरच पॉपअप विंडो सुरू होण्याची शक्यता आहे.

वेळेवर प्रक्रिया पूर्ण न केल्यास, साइटवर गर्दी होऊन अडचणी निर्माण होऊ शकतात.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू राहण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/kutumbiyache-sarkarla-madathey/