केसांच्या वाढीसाठी तयार करा ‘हे’ ३ होममेड हेअर स्प्रे, कसे बनवायचे ते जाणून घ्या

केसांच्या वाढीसाठी तयार करा ‘हे’ ३ होममेड हेअर स्प्रे, कसे बनवायचे ते जाणून घ्या

तुम्हाला जर केसांची वाढ वाढवायची असेल त्यातच नैसर्गिकरित्या केस मजबूत आणि जाड हवे

असतील तर तुम्ही नैसर्गिक हेअर स्प्रे वापरा. हे नैसर्गिक घरगुती हेअर स्प्रे केवळ केसांची वाढ वाढवत

नाहीत तर केस गळतीपासून देखील आराम देतात.

Related News

आपले केस सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. यासाठी लोक विविध प्रकारचे बाजारात उपलब्ध

असणारे महागडे हेअर प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु या प्रॉडक्टमध्ये असलेले केमिकल केसांना

कमकुवत बनवतात व केसांची वाढ देखील नीट होत नाही. तसेच त्यामध्ये असलेले पॅराबेन्स आणि

अल्कोहोल केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात त्यामुळे केस गळतात. पण तुम्हाला नैसर्गिकरित्या

केस वाढवायचे असतील तर तुम्ही घरच्या घरी या घरगुती वस्तू वापरून हेअर स्प्रे बनवून केसांच्या वाढीसाठी त्यांचा वापर करू शकता.

गोष्टींचा वापर करा. हे हेअर स्प्रे तुम्ही तुमच्या केसांना लावल्याने कोणतेही नुकसान होणार नाही.

चला तर मह आजच्या लेखात आज आपण जाणून घेऊयात की केसांच्या वाढीसाठी

घरातील कोणत्या गोष्टी वापरून तुम्ही हेअर स्प्रे बनवू शकता. जे तुमचे केस जलद वाढवण्यास मदत करतील.

ऑलिव्ह आणि लैव्हेंडर ऑइल हेअर स्प्रे

ऑलिव्ह ऑइल हे तुमच्या केसांना खोलवर ओलावा देते आणि केसांची मुळे मजबूत करतात.

तसेच यात तुम्ही जर लैव्हेंडर तेल मिक्स करू लावलात तर केस गळती कमी होते. तसेच हे तेल केसांच्या वाढीस देखील चालना देते.

  • एका स्प्रे बाटलीत पाणी घ्या.
  • त्यात ऑलिव्ह ऑइल आणि लैव्हेंडर ऑइल मिक्स करा.
  • आता हे ऑइल चांगले मिसळा आणि स्प्रेप्रमाणे केसांवर लावा.
  • रात्रभर तसेच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस धुवा.

कडुलिंब आणि नारळ तेलाचे हेअर स्प्रे

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे केसांची मुळे स्वच्छ ठेवतात.

तसेच नारळाचे तेल केसांना पोषण देते आणि त्यांची वाढ वाढवते.

  • सर्वप्रथम कडुलिंबाची पाने घेऊन ती स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर कडुलिंबाच्या पानांची अगदी पातळ पाण्यासारखी पेस्ट बनवा.
  • या त्यात नारळ तेल मिक्स करुन मिश्रण चांगले मिसळा.
  • तयार झालेले मिश्रण स्प्रे बाटलीत भरा आणि केसांवर स्प्रे करा.
  • केसांवर स्प्रे केल्यानंतर १-२ तासांनी केस धुवा.

आवळा आणि शिकाकाई हेअर स्प्रे

आवळा केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते, जे केसांचे आरोग्य सुधारते.

तसेच शिकाकाई हे तुमच्या केसांना मजबूत बनवते.

  • बाजारात उपलब्ध असलेली आवळा आणि शिकाकाई पावडर पाण्यात मिक्स करा आणि चांगले मिसळा.
  • मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा आणि तयार झालेले नैसर्गिक हेअर स्प्रे केसांवर स्प्रे करा.
  • त्यानंतर केस ३० मिनिटांनी स्वच्छ धुवा.

अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी नैसर्गिक हेअर स्प्रे बनवून त्यांचा वापर केसांवर योग्य पद्धतीने करा.

त्यानंतर चांगल्या प्रकारे तुमच्या केसांची वाढ होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Read more news here : https://ajinkyabharat.com/nashik-vikasasathi-dattak-ghetalam-kumbhameyaya-nimtanam-shahracha-face-badalanayi-muth-sandhi-devendra-fadnavis/

Related News