कर्णधाराला दुखापत, अंतिम क्षणी बदल होणार का?

निर्णायक लढतीआधीच धक्का! कर्णधार जखमी…

आशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. या सामन्यातील विजय थेट अंतिम फेरीचे तिकीट ठरवणार असल्याने चाहत्यांचे डोळे या लढतीकडे लागले आहेत. मात्र, सामन्यापूर्वीच बांगलादेशच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार लिटन दास सरावादरम्यान जखमी झाला आहे.आयसीसी अकादमी ग्राऊंडवर फलंदाजी करताना लिटन दासच्या पाठीला दुखापत झाली. स्क्वेअर कट मारताना अचानक वेदना जाणवल्याने तो जमिनीवर कोसळला आणि सराव अर्धवट सोडावा लागला. संघाचे फिजिओ बायझिद अल इस्लाम यांनी तातडीने उपचार केले, मात्र वेदना कायम असल्याने दासने सरावातून माघार घेतली.बीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लिटन दासची दुखापत किती गंभीर आहे याची तपासणी सुरू आहे. बाह्यरील लक्षणं गंभीर दिसत नसली तरी त्याच्या खेळण्याबाबतची शंका अजून कायम आहे. जर तो भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात उतरला नाही, तर बांगलादेशसाठी हा मोठा धक्का ठरेल.लिटन दासने आशिया कपमध्ये आतापर्यंत 29.75 च्या सरासरीने 119 धावा काढल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 129.34 इतका आहे. यष्टीरक्षक आणि कर्णधार या दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या लिटन दासच्या गैरहजेरीमुळे संघाला केवळ फलंदाजीतच नाही तर नेतृत्वातही मोठी पोकळी भासेल.भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वीच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बांगलादेशच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अखेर लिटन दास मैदानात उतरेल की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

read also :https://ajinkyabharat.com/ind-vs-pak-abhishek-shubmanchi/

Related News