कारंजा लाड : सुनील फुलारी
शहरात दिवसेंदिवस शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या विनापरवाना ऑटोंची संख्या
वाढत असून यामुळे शाळेच्या वेळात प्रचंड वाहतूक अडथळा निर्माण होत आहे.
विशेषतः गुरु मंदिर मार्गावर शाळेच्या मधोमध ऑटो उभे करून रस्त्याचा अडथळा केला जात असून याकडे वाहतूक
शाखेचे पोलीस कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारी गावाबाहेर आपले कर्तव्य बजावताना दिसतात, मात्र शहरातील मुख्य भागात,
विशेषतः शाळा परिसरात, नियमभंग करणाऱ्या ऑटोंवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येते.
शाळकरी ऑटो चालकांकडे वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन विमा, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता यासाठी आवश्यक असलेली
कोणतीही कागदपत्रे नसतानाही विद्यार्थ्यांनाぎंण केली जात आहे.
यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व प्रकाराकडे पोलिसांकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असून काही पोलिस कर्मचाऱ्यांकडून
आर्थिक व्यवहार केला जातो काय, असा सवाल नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rural-bhagat-sakarba-utsav-sajra/