कारंजा नगरीत सुरू होणार नऊ दिवसांचा धार्मिक महोत्सव

सोमवारपासून कारंजा शक्तीपीठात नवरात्र उत्सवाची धूम

कारंजा नगरीचे आराध्य दैवत व कारंजेकरांचीची कुलस्वामिनी, ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या श्री कामक्षा देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला सोमवार दि 22 सप्टेंबर 2025 पासून प्रारंभ होत असून ,श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण भारतात श्री कामाक्षा देवीचे दोन ठिकाणी शक्तीपीठ आहेत त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे वाशिम जिल्ह्यातील पवित्र शक्तिपीठ कारंजा नगरी होय. श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवी म्हणून ओळखल्या जाते, दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्य भव्य यात्रा मंदिर परिसरात भरत असते. या मंदिराचा कारभार महाजन कुटुंबाकडे आहे. सोमवार दि 22 सप्टेंबर 2025 रोजी देवीचा मंगलाभिषेक व घटस्थापना होणार आहे, त्यादिवशी रात्री नऊ वाजता मुरलीधर महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल ,दि 23 ला दुपारी 3 वाजता रुक्मिणी महिला भजनी मंडळ व रात्री वनेश्वर महिला भजनी मंडळ ,दि 24 ला दुपारी स्वरांजली महिला भजनी मंडळ व रात्री 8 वाजता नेहा संजय किटे यांचा कराओके वर भजनाचा कार्यक्रम ,दि 25 ला श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ महावीर कॉलनी व रात्री सदगुरू महिला भजनी मंडळ ,दि 26 ला दुपारी सुकन्या महिला भजनी मंडळ शिक्षक कॉलनी व रात्री अष्टविनायक गुरुदेव भजनी मंडळ ,दि 27 ला दुपारी तुळजाभवानी महिला भजनी मंडळ व रात्री7.30 ला षष्ठीचा जोगवा श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच कारंजा श्री ज्ञानेश्वर कडोळे व परिवार यांचा जोगव्याचा कार्यक्रम नंतर महालक्ष्मी महिला भजनी मंडळ ,दि 28 ला दुपारी गुरु गजानन महिला भजनी मंडळ सुंदर वाटिका, दि 29 ला दुपारी 2 ते 5 पर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी प्रणित उपासकाचे सप्तशतीपाठ व रात्री 9 वाजता महाअष्टमीचा होम हवन, पूर्णाहुती व देवीची महाआरती रात्री 12 वाजता होणार आहे नंतर दीपमाळ प्रज्वलन कार्यक्रम होईल, दि 1 ऑक्टोबर नवमी असल्यामुळे देवीचा महानैवेद्य व रात्री 7.30 ला सौ अर्चनाताई तोमर यांचा कराओके वर भक्ती संगीताचा कार्यक्रम ,दि 2 ला विजयादशमी निमित्त सकाळी महाभिषेक, श्री कामक्षा मातेचा श्रृंगार व सिमोलंघन होऊन देवीची महाआरती होईल, नवरात्र उत्सवात दररोज देवीची आरती दुपारी 12 वाजता व रात्री 7 वाजता होईल . कामाक्षा मातेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवहान श्रीकामक्षा माता संस्थान कडून श्री दिगंबर महाजन महाराज व भक्त परिवाराकडून करण्यात आले आहे, नवरात्री उत्सवा नंतर भव्य महाप्रदासाचे आयोजन मंदिराच्या वतीने करण्यात येत असते.

read also : https://ajinkyabharat.com/hivarkhede-polys-stationumadhyas-plantation/