कारंजा :यंदा कारंजा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने पर्यावरणपूरक कृत्रिम तलावाची अभिनव योजना राबवून बाप्पांचे विसर्जन शिस्तबद्ध आणि सुरक्षित बनवले. पारंपरिक पद्धतीने नद्या-नाल्यांमध्ये गणपती विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाला टाळण्यासाठी नगरपालिकेने विविध ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली होती.
विसर्जनाच्या वेळी नगरपालिकेचे कर्मचारी सतत उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन करत होते. यामुळे विसर्जनाची प्रक्रिया सुकर व शिस्तबद्ध झाली. लहान मुलेही आनंदाने गणपती विसर्जनात सहभागी झाली आणि उत्साहात हा धार्मिक सोहळा पार पडला.
नगरपालिकेच्या पर्यावरणपूरक या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले. “अशा उपाययोजनांमुळे निसर्गाची देखील जपणूक होते आणि धार्मिक सोहळे पारंपरिक उत्साहात साजरे करता येतात,” असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व आदर निर्माण झाला असून, भविष्यातही अशीच पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध व्यवस्था कायम ठेवावी, अशी प्रचंड मागणी होत आहे.
या योजनेमुळे पर्यावरण रक्षणाचे संदेश समाजात प्रबळपणे पोहोचले आहेत.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/iranamadhyay-international-niryatit-motha-yash/