करंजा मध्ये प्रथमच आयोजित हेअरकट मास्टर क्लास वर्कशॉपला सौंदर्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करंजा मध्ये प्रथमच आयोजित हेअरकट मास्टर क्लास वर्कशॉपला सौंदर्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करंजा, 21 जुलै 2025 – करंजा लाड येथे सौंदर्य व हेअरकट क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत,

“2 दिवसीय हेअरकट मास्टर क्लास वर्कशॉप” प्रथमच पार पडले.

या वर्कशॉपला सौंदर्यप्रेमी आणि नवोदित हेअर आर्टिस्ट्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन कट अँड शेव सलूनचे सुप्रसिद्ध हेअर आर्टिस्ट व एज्युकेटर शुभम चौहान यांनी केले होते.

कार्यशाळेतील आकर्षण केंद्र ठरले – बटरफ्लाय व सिग्नेचर हेअरकट्स

पहिल्या दिवशी शुभम चौहान यांनी “बटरफ्लाय” आणि “सिग्नेचर” हेअरकटचे सादरीकरण करून आधुनिक हेअरकट्सची सखोल माहिती दिली.

उपस्थितांनी तंत्रशुद्धतेने सादर केलेल्या या शैलींचा आनंद घेतला.

दुसऱ्या दिवशी नॅनोप्लास्टी आणि हेअर स्पावर भर

दुसऱ्या दिवशी नॅनोप्लास्टी ट्रीटमेंट आणि हेअर स्पावर प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देण्यात आली.

सहभागी सौंदर्यतज्ज्ञांना प्रत्यक्ष मॉडेलवर काम करण्याची संधी देण्यात आली, ज्यामुळे तांत्रिक ज्ञानासोबत आत्मविश्वासही वाढला.

प्रशस्तिपत्रक आणि पाहुण्यांचा गौरव

सर्व सहभागींचा सन्मान प्रशस्तिपत्रक देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सपना चौधरी (करंजा), पूजा लाड (करंजा), सोनाली डोंगरे (दिग्रस),

ज्योती कावरे (मंगरुळपीर), नीलीमा सूर्यवंशी (शेलुबाजार) यांचे विशेष योगदान होते.

उपस्थितांनी आयोजक शुभम चौहान यांचे मनःपूर्वक कौतुक केले.

हा वर्कशॉप अनुभव शिक्षण, प्रेरणा आणि आनंदाने भरलेला ठरला – अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

करंजा शहरात अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच आयोजित झाल्याने सौंदर्य क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/deputy-chief/